Central Railway Festive Special Train: रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या लांब सुट्टांमुळं अनेकजण बाहेरगावी जाण्याचा प्लान आखत आहेत. लांब सुट्ट्यांमुळं रेल्वेची तिकीटे मिळवण्यासाठी खूपच ताटकळत राहावे लागण्याची शक्यता आहे. अशावेळी होणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी 18 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि पुणे या महनगरामधून नागपूर, कोल्हापूर आणि गोवा या प्रमुख मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
9 तारखेला रक्षाबंधनाचा सण आहे. त्या दिवशी शनिवार आला आहे. तर 10 तारखेला रविवार असल्यामुळं सुट्टी आहे. जोडून आलेल्या या सुट्टीत अनेकजण गावी जाण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्लान आखू शकतात. तर, 15 ऑगस्ट शुक्रवारी असून 16-17 ऑगस्टला शनिवार-रविवार आला आहे. त्यामुळं या लाँग विकेंडला अनेक जण फिरायला जाण्याचा प्लान आखतात. अशावेळी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गांवर विशेष सेवा धावणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर: एकूण 6 फेऱ्या
लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव: एकूण 4 फेऱ्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कोल्हापूर: एकूण 2 फेऱ्या
पुणे ते नागपूर: एकूण 6 फेऱ्या
गाडी क्रमांक 01123/01124 आणि 02139/02140: या गाड्या दिनांक 9, 10, 15 आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई आणि नागपूर दरम्यान धावतील.
थांबेः दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
डब्यांची रचनाः 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 गार्ड ब्रेक व्हॅन.
गाडी क्रमांक 01125/01126 आणि 01127/01128: या गाड्या दिनांक 14, 15, 16 आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान धावतील.
थांबेः ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड.
डब्यांची रचनाः या गाड्यांमध्ये वातानुकूलित प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीसह शयनयान डबे असतील.
गाडी क्रमांक 01417/01418: ही गाडी दिनांक 8 ऑगस्ट रोजी मुंबईहून आणि 10 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूरहून सुटेल.
थांबेः दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज.
डब्यांची रचनाः 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान आणि 6 सामान्य द्वितीय श्रेणी.
गाडी क्रमांक: 01469/01470 आणि 01439/01440.
धावण्याचा कालावधी: 8, 10, 14, 15, 16 आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी पुणे आणि नागपूर दरम्यान धावतील.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा.
डब्यांची रचना: 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान आणि 6 सामान्य द्वितीय श्रेणी.
या विशेष गाड्यांसाठी आरक्षण रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
07 ऑगस्ट 2025 पासून गाडी क्रमांक 01123/24, 01417/18, 01469/70 साठी आरक्षण सुरू झाले आहे.
09 ऑगस्ट 2025 पासून गाडी क्रमांक 02139/40, 01439/40, 01125, आणि 01127 साठी आरक्षण सुरू होईल.
प्रवाशांनी तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांच्या वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अॅप तपासावे.