Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जेलमधून बाहेर आल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप पुण्यात होतोय

जेलमधून बाहेर आल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप पुण्यात होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवसही आजच आहे. त्यामुळे २० वा स्थापना दिवस तसेच हल्लाबोल आंदोलनाचा समारोप अशा दुहेरी औचित्यावर पक्षाचं शक्तीप्रदर्शन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच पक्षाचे सगळेच दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवल्यानंतर छगन भुजबळ जामीनावर बाहेर आले आहेत. जेलमधून बाहेर आल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आले आहेत.

उदयनराजे गायब

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित असले तरी खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून गायब दिसले. उदयनराजे भोसले या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाला पोहोचले पण ते स्टेजवर आले नाहीत. उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवरून गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. 

Read More