आपल्या हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाय ही देवता मानली जाते. हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये चंद्रा गायीची जरा जास्तच चर्चा आहे. कारण ही गाय गोठ्यात राहत नसून चक्क लक्झरी बंगल्यात राहते. एवढचं नाहीतर शॉवरच्या पाण्यानं अंघोळही करते. गायीसाठी गादीचा बिछानाही आहे. एवढचं नाहीतर गाय एसीत राहते आणि चारचाकी गाडीतही फिरते. चंद्रा गायीच्या दिमतीला सात ते आठ लोकं आहेत. धार्मिक कार्यक्रमातही चंद्र सहभागी होते आणि सोमवारी गाय उपवासही धरते. घरातील मंदिरात भक्तीभावात चंद्रा गाय देखील लिन होते.
जिथे सीताराम म्यानेवार जातात तिकडे चंद्रा ही त्यांच्या बरोबर जाते. कोणताही कार्यक्रम असो तिथे गाय त्यांच्या सोबत असते आणि संपूर्ण कार्यक्रम होई पर्यंत ती त्यांच्या शेजारी बसलेली असते.आतापर्यंत 11 महिन्याच्या चंद्राने प्रयागराजचा कुंभमेळा, चार ज्योतिर्लिंग,तीन शक्तीपीठ बघितली आहेत. आता चंद्राला सर्व ज्योतिर्लिंग आणि चार धामला जायचं आहे, मात्र ती पशू असल्याने तिला मंदिरात प्रवेश नाकारला जातोय. कुत्रे,मांजर मंदिरात वावरतात तर मग गोमातेला मंदिरात प्रवेश का नाकारला जातोय असा सवाल म्यानेवार कुटुंबीय करतात. येत्या 24 मे रोजी चंद्राच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी अनेकांनी विवाहासाठी नोंदणीही केली आहे.
सध्या सगळीकडे चंद्रा गायीची चर्चा आहे. चंद्रा गायीला पाहण्यासाठी आज लोक गर्दी करताना दिसतात.