Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

रोडवर अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबाचे धक्कादायक महाराष्ट्र कनेक्शन! पुण्यात 200 कोटींची बेनामी मालमत्ता आणि मुंबईत...

रोडवर अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबाचे धक्कादायक महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आले आहे.  पुण्यात 200 कोटींची बेनामी मालमत्ता आणि मुंबईतही प्रॉपर्टी सापडली आहे. 

  रोडवर अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबाचे धक्कादायक महाराष्ट्र कनेक्शन! पुण्यात 200 कोटींची बेनामी मालमत्ता आणि मुंबईत...

Changur Baba Maharashtra : उत्तर प्रदेश एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी अटक केलेल्या जलालुद्दीन उर्फ ​​छांगुर बाबा याचे धक्कादायक महाराष्ट्र  कनेक्शन उघडकीस आले आहे. छांगुर बाबा याची पुण्यात 200 कोटींची बेनामी मालमत्ता सापडली आहे. मुंबईतही  ​​छांगुर बाबाची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. रस्त्यावर अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबाकडे 100 कोटींची संपत्ती सापडली यानंतर धर्मांतराचे मोठ रॅकेट उघडकीस आले. छांगुर बाबाचे महाकांड पाहून पोलिसही हादरले आहेत. हा बाबा हिंदू तरुणीचे अत्यंत भयानक पद्धतीने धर्मांतर करायचा. 

उत्तर प्रदेशातील नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धर्मांतराच्या बेकायदेशीर नेटवर्कशी संबंधित चौकशी दरम्यान छांगुर बाबाला अटक करण्यात आली.  छांगुर बाबाबाबकडे  अब्जावधी रुपयांची मालमत्ता आणि परकीय निधी सापडल्याने खळबळ उडाली. उत्तर प्रदेश एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलरामपूरसह नेपाळच्या सीमावर्ती भागात हिंदू संघटनांच्या प्रयत्नांमुळे दोन दिवसांपूर्वी काही लोक घरी परतले तेव्हा जलालुद्दीन उर्फ ​​छांगूर बाबा यांचे नाव समोर आले. यानंतर, एसटीएफने बलरामपूरमधील उत्तरौला येथे छापा टाकला आणि जमालुद्दीन उर्फ ​​घांगूर बाबा, त्याची सहकारी नीतू उर्फ ​​नसरीन आणि इतरांना अटक केली. छांगूर बाबावर 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 

छांगूर बाबाने परदेशी निधीतून कोट्यवधी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता गोळा केली. बाबाच्या अशा अनेक मालमत्तांचे कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे आहेत, ज्यांची आयकर, फेमा आणि ईडी अधिकारी संयुक्तपणे चौकशी करत आहेत. अशा अनेक मालमत्ता महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईतही आहेत.  छांगूर बाबाने त्याच्या रॅकेटसह पुण्यातील मावळ तहसीलमध्ये आदिवासींसोबत कोट्यावधीच्या रुपयांचा जमिनीचा करार केला होता. याची आजची किंमत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या करारातून मिळणारा अर्धा नफा  छांगूर बाबा  आणि त्याचे भागीदार नवीन रोहरा याला मिळत होता. 

ईडीच्या चौकशी दरम्यान महाराष्ट्रातील मावळ तहसीलमधील लोणावळा येथे असलेला एक जमीन व्यवहार झाला आहे. यासाठी सुरुवातीची देयके परदेशी निधीतून देण्यात आल्याचा आरोप आहे. ही जमीन छांगूर बाबाच्या नावावर नाही तर त्याच्या काही साथादारांच्या नावावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  
 

 

Read More