Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लोणावळ्यात मोठा आश्रम उभारुन तिथं... छांगुर बाबाचा भयानक प्लान; महाराष्ट्रावर होता पूर्ण फोकस

छांगुर बाबाने लोणावळ्यात बेकायदा जमीन खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जागेवर तो आश्रम उभारणार होता.   

 लोणावळ्यात मोठा आश्रम उभारुन तिथं...  छांगुर बाबाचा भयानक प्लान; महाराष्ट्रावर होता पूर्ण फोकस

Changur Baba Maharashtra : उत्तर प्रदेश एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी अटक केलेल्या जलालुद्दीन उर्फ ​​छांगुर बाबाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. छांगुर बाबाने महाराष्ट्रावर पूर्ण फोकस केला होता. छांगुर बाबाने भयानक प्लान बनवला होता. छांगुर बाबा लोणावळ्यात मोठा आश्रम उभारणार होता. यासाठी त्याने कोट्यावधीच्या जमीनीचे व्यवहार केले होते. 

उत्तर प्रदेश येथील एका ढोंगी बाबाने लोणावळा येथे बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याचं उघड झाले असून, अवैध धर्मांतराच्या गंभीर आरोपांखाली छांगुर बाबा सध्या अटकेत असून छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीन असं त्याचे नाव आहे. आत्तापर्यंत त्याने 100 कोटींची माया जमवली आहे. त्यापैकी 16 कोटी रुपयांची जमीन लोणावळ्यातील कुणेनामा या गावात सर्व्हे नंबर 40 गट नंबर 1आणि दोन अशी खरेदी केल्याचं उघड झाले आहे. मात्र समोर आलेले जमिनीचे सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. 

या छांगुर बाबाला विदेशातून पैसे येत असल्याचं एटीएस च्या तपासात उघड झाले असून आत्तापर्यंत शेकडो हिंदूंना धर्मपरिवर्तनाच्या बंधनात अडकवल्याचा आरोप छांगुर बाबा वर करण्यात आलाय. लोणावळ्यात हा बाबा येथे मोठा आश्रम उभारणार होता. मात्र त्यापूर्वी एटीएस च्या कारवाईत या बाबाला ताब्यात घेण्यात आले..या प्रकरणाची चौकशी सुरू असून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोणावळ्यातील कुणेनामा येथे या जमिनीचा वाद असून छांगुर बाबाने येथील जमीन शेतकऱ्यांना विश्वासात न घेता 9 ऑगस्ट 2023 ला खरेदी केली आहे असा आरोप शेतकरी मारुती साठे, कांताबाई तावरे आणि सुंदराबाई इंदुलकर या शेतकऱ्यांच्या वकिलाने केलाय तसेच याबाबत लवकरच छांगुर बाबा तसेच जमीन खरेदी विक्री करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं शेतकरी सुनील तावरे यांनी सांगितलं. तर या खोट्या जमीनीच्या कागदपत्रे खरेदी बाबत शेतकरी जिल्हाधिकारी, गृहमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत.

 

Read More