Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ChatGPT मुळे झाला मालामाल! 3 महिन्यात 28 लाखांची कमाई

Lance Junck च्या या  ChatGPT Masterclass: A Complete ChatGPT Guide for Beginners या ट्रेनिंग कोर्ससाठी 15 हजार  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.  यातून Lance Junck  34,913 डॉलर ( जवळपास 28.6 लाख रुपये) इतकं प्रॉफिट झालं आहे. 

ChatGPT मुळे झाला मालामाल! 3 महिन्यात 28 लाखांची कमाई

ChatGPT : तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या चॅटजीपीटीचं सध्या प्रचंड कुतुहल आहे. मात्र या चॅटजीपीटीमुळे आणि आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे अनेक क्षेत्रातीलल्या नोक-यांना धोका निर्माण  झाला आहे. तसेच एआयचा वापर भविष्यात कमालीचा वाढणार आहे.  फोर्ब्सच्या अहवालानुसार एआय स्टार्टअप्सची संख्या 14 पट वाढली आहे. त्यातच आता  ChatGPT मुळे एक व्यक्ती मालामाल झाला आहे. 3 महिन्यात 28 लाखांची कमाई केली आहे. 

चॅटबॉट चॅटजीपीटी नेमकं आहे तरी काय?

चॅटबॉट चॅटजीपीटी हे कृत्रिम बुद्धीमत्तेवर काम करतं. त्यामुळे आयटी, मीडिया, कायदा, मार्केट रिसर्च अॅनालिस्ट, शिक्षक, प्राध्यापक, फायनान्स, ट्रेडर्स, शेअर अॅनालिस्ट, ग्राफिक डिझायनर्स, अकाऊंटंट, कस्टमर सर्व्हीस एजंट या क्षेत्रांना मोठं आव्हान निर्माण झालंय. या क्षेत्रात चॅटजीपीटीमुळे नोकरकपातीचा धोका निर्माण झाला आहे. इटलीत चॅटजीपीटीवर बंदी घालण्यात आली आहे. गोपनीयतेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. चॅटजीपीटीवर बंदी घालणारा इटली हा पहिला पाश्चिमात्य देश आहे.

3 महिन्यात 28 लाखांची कमाई

2022 च्या शेवटच्या महिन्यात Lance Junck नावाच्या 23 वर्षीय तरुणाने  ऑनलाइन कोर्स लाँच केला होता. Udemy वर लाँच केलेल्या या कोर्समध्ये  ChatGPT चा वापर कसा करायचा याचे ट्रेनिंग त्याने दिले. या कोर्सच्या माध्यमातूनच Lance Junck ने तीन महिन्यात 28 लाखांची कमाई केली. 

Lance Junck च्या या  ChatGPT Masterclass: A Complete ChatGPT Guide for Beginners या ट्रेनिंग कोर्ससाठी 15 हजार  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.  यातून Lance Junck  34,913 डॉलर ( जवळपास 28.6 लाख रुपये) इतकं प्रॉफिट झालं आहे. 

Lance Junck चा 7 तासांचा आहे. यासाठी 20 डॉलर इतके शुल्क आकारले जाते. या कोर्समध्ये 50 लेक्चर्स घेतले जातात. सुरुवातील या कोर्समध्ये   ChatGPT बेसिक माहिती देण्यात आली. मात्र, आता  Lance Junck बिजनेस, स्टूडेंट्स आणि प्रोग्रामर्ससाठी  स्पेसिफिक ChatGPT एप्लिकेशन्सचे ट्रेनिंग देत आहे. 
 

Read More