Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाशिक जिल्हा बँकेवरून भुजबळ-कोकाटेंमध्ये जुंपली; सोकॉल्ड नेत्यांमुळे बँक बुडाल्याचा भुजबळांचा आरोप

Chhagan Bhujbal and Manikrao Kokate : नाशिक जिल्हा बँक ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची बँक होती. पण, सर्वपक्षीय सोकॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता.

नाशिक जिल्हा बँकेवरून भुजबळ-कोकाटेंमध्ये जुंपली; सोकॉल्ड नेत्यांमुळे बँक बुडाल्याचा भुजबळांचा आरोप

Chhagan Bhujbal and Manikrao Kokate : नाशिक जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात मतभेद दिसून आले आहेत. भुजबळ यांनी बँकेच्या अडचणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना जबाबदार धरत या सोकॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली असा आरोप केला होता. आता त्यांच्या आरोपाला कृषिमंत्री कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

भुजबळ-सोकॉल्ड नेत्यांमुळे नाशिक जिल्हा बँक बुडाली, आता बँकेची निवडणूक घेऊ नका नाहीतर यांची मुलं उभे राहायला तयारच आहेत. बँक कधीच वर येणार नाही. कोकाटे- भुजबळांचा गैरसमज झालाय, राजकीय नेत्यांमुळे बँक बुडाली असं म्हणता येणार नाही. भुजबळ-तुम्हाला माहिती असेल तर सांगा बँक कुणी बुडवली.

नाशिक जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटेंमध्ये यावरून चांगलीच खडाजंगी झालीय. जिल्हा बँकेबाबत बोलताना भुजबळांनी सोकॉल्ड नेत्यांमुळे बँक बुडाली असल्याचं म्हटलंय. तसेच बँक पुन्हा पूर्वस्थितीत येईपर्यंत प्रशासक कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केलीय. तर एकेकाळचे बँकेचे संचालक असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी हे आरोप साफ धुडकावून लावले आहेत. 

दरम्यान कृषिमंत्री कोकाटेंच्या या उत्तरानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी त्यांना अनेक तिखट सवाल करत आव्हान दिलंय.

भुजबळ - कोकाटेंमधील संघर्षाच्या रुपाने जिल्हा बँकेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असला तरी काही दिवसांपूर्वी बँकेने 25 माजी संचालकांना थकबाकीबाबत नोटिसा पाठवल्या होत्या. 

या माजी संचालकांना नोटीसा
--माणिकराव कोकाटे -1.87 कोटी 
--राहुल ढिकले 8.79 कोटी 
--दिलीप बनकर  8.65 कोटी 
--धनंजय पवार 7.57 कोटी 
--जे पी गावित 7.21 कोटी 
--माणिकराव बोरस्ते 7.02 
--शोभा बच्छाव 2.11 कोटी 
--वसंत गीते 1.89 कोटी
--माणिकराव शिंदे 67 लाख 
--डॉ. राहुल आहेर 43 लाख 

नाशिक जिल्हा बँक नेमकी कशामुळे अडचणीत आली. जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार की प्रशासकाच्या हातीच बँकेचा कारभार सुरू राहणार हे ही लवकरच स्षष्ट होईल. परंतु या निमित्ताने राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये सुरू झालेल्या संघर्षाची चर्चा नाशिक जिल्ह्यात जोरकसपणे सुरु आहे.

Read More