Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळांना मिळाले; मुंबईत शपथविधी

धनंजय मुंडे यांचं खातं छगन भुजबळ यांना दिलं जाणार आहे. भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद मिळणार.  सकाळी दहा वाजता राजभवनात होणार शपथविधी. 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!  धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळांना मिळाले; मुंबईत शपथविधी

Chhagan Bhujbal will take oath as minister : महाराष्ट्राच्या राजकाराण मोठी घडामोड घडणार आहे. धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळांना मिळाले आहे. मुंबईत (20 मे रोजी) छगन भुजबळ यांचा मंत्री पदाची शपथविधी सोहळा पार पडणार आहे. धनंजय मुंडे यांचं खातं छगन भुजबळ यांना दिलं जाणार आहे. भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद मिळणार.  सकाळी दहा वाजता राजभवनात होणार शपथविधी. 

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे  चांगलेच अडचणीत सापडले. या प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला. धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रीपदाच्या काजीनाम्यासाठी दबाव आला. अखरे फेब्रुवारी 2025 मध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा जारीनामा द्यावा लागला. अन्न व नागरी पुरवठा या खात्याचे मंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे होते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीत  मंत्रिपदाची जागा रिकामी झाली आहे.  त्यामुळे धनंजय मुंडेंच्या जागेवर कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते.

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळांच्या नावाची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादीत नाराज होते, त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. भुजबळांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचा छगन भुजबळ यांच्याकडे मोठा अनुभव आहे.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी काही आमदारांना मंत्रीपदाची शपत देण्यात आली. या पहिल्या टप्प्यात धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले होते. 

 

 

 

Read More