Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

छत्रपती संभाजीराजे यांच्या 'स्वराज्य'ला रायगडचा पाठिंबा, उमेदवारी अर्जावर 'या' आमदाराने केली पहिली सही

छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांनी आपणास पाठिंबा देऊन राज्यसभेवर निवडून द्यावे असे आवाहन केले होते. यासाठी ते अपक्ष आमदारांच्या भेटी घेणार होते.   

छत्रपती संभाजीराजे यांच्या 'स्वराज्य'ला रायगडचा पाठिंबा, उमेदवारी अर्जावर 'या' आमदाराने केली पहिली सही

उरण : छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrapati Shivaji Maharaj ) यांचे वंशज आणि राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे ( Chatrapati Sambhaji Raje ) यांनी 'स्वराज्य' ( Swarajya ) संघटनेची घोषणा नुकतीच केली होती. तसेच, त्यांनी राज्यसभेसाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच केले होते.

छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांनी आपणास पाठिंबा देऊन राज्यसभेवर निवडून द्यावे असे आवाहन केले होते. यासाठी ते अपक्ष आमदारांच्या भेटी घेणार होते.

छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून लढणार अशी घोषणा करताच महाराष्ट्रातून उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी ( Mahesh Baldi ) यांनी त्यांना पाठिंबा जाहीर दिला आहे. संभाजी राजे यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पहिली सही केली आहे.

आज दि. १६ मे रोजी छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी आमदार बालदी यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरी केली.

छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे, राज्य समन्वयक अंकुश कदम, धनंजय जाधव हे उपस्थित होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Read More