Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

छत्रपती संभाजीनगरात शिवसेना UBTच्या नेत्याकडून शेतकऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर. शेतकऱ्याला घरी बोलवून जबर मारहाण   

छत्रपती संभाजीनगरात शिवसेना UBTच्या नेत्याकडून शेतकऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : (Chhatrapati Sambhajinagar News) राज्यात गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून अनेक प्रकरणांमध्ये स्थानिक नेत्यांकडून कायदा हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर इथं एका शिवसेना UBTच्या सचिन घायाळ यांच्याकडून एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

ऊसाचे थकीत बिल मागितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पैठण पोलिसांत सचिन घायाळसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

सचिन घायाळ असं मारहाण करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्याचं नाव असून, राहुल कांबळे असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याला घायाळसह चौघांकडून मारहाण केल्याचा आरोप असून, आता पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. 

हेसुद्धा वाचा : महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या, आश्रमातच...

 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथे अशाच एका धक्कादायक घटनेनं खळबळ माजली होती. जिथं महिला किर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला होता. सध्या महाराष्ट्रात आषाढी वारीचा उत्साह सुरू असताना महिला किर्तनकाराचा खून करण्यात आल्याच्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

 

Read More