Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'....तर पक्ष तुम्हाला खड्ड्यात ढकलेल', देवेंद्र फडणवीसांनी दिला जाहीर इशारा; म्हणाले 'उद्धव ठाकरे...'

निवडणुकांच्या तोंडावर वाद टाळा, एकत्र राहा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला असून, जर पक्षाला खड्ड्यात घातलं तर पक्ष खड्ड्यात घालेल असा इशाराही दिला आहे.   

'....तर पक्ष तुम्हाला खड्ड्यात ढकलेल', देवेंद्र फडणवीसांनी दिला जाहीर इशारा; म्हणाले 'उद्धव ठाकरे...'

निवडणुकांच्या तोंडावर वाद टाळा, एकत्र राहा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला असून, जर पक्षाला खड्ड्यात घातलं तर पक्ष खड्ड्यात घालेल असा इशाराही दिला आहे. वर्ध्यातील सेवाग्राममध्ये भाजपाची विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल असंही त्यानी सांगितलं आहे. मित्रपक्षांवर टीका टाळा, भाजपाचं वर्चस्व दाखवा असा कानमंत्रही त्यांनी दिला आहे. 

'मित्रपक्षांवर टीका करायची नाही'

"आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढत आहोत. अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार देऊ. अडचण असेल तिथे आमच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायचे आहेत. पण शक्यतो निवडणुका महायुतीत करायच्या. ज्या ठिकाणी काही कारणाने महायुतीमध्ये निवडणूक होणार नाही, त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही. जर आपण राज्यात एकत्र काम करत आहोत, तर आपणच आपल्या मित्रपक्षावर टीका करायची हे योग्य नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

'उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य'

"2017 साली आपण पाहिलं, उद्धव ठाकरे आपल्यासोबत सत्तेत होते आणि आपल्यालाच शिव्या द्यायचे. ती परिस्थिती आपली नसून तसं करायचं नाही आहे. त्यामुळे शक्यतो महायुती आणि महायुती होणार नाही तिथे आपल्याला मैत्रीपूर्ण, समन्वयाने निवडून यायचं आहे," असंही त्यांनी सांगितलं. 

'...तर पक्ष खड्ड्यात घालेल'

"निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे आणि वाद संपवले पाहिजे. अनेक पक्षांचं पतन यामुळेच झालं की, एकाने दुसऱ्याने आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पक्षाला खड्ड्यात घातलं. अशाप्रकारे आपल्या पक्षात होता कामा नाही. कोणी जर पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पक्ष करेल. खड्ड्यात घालणं म्हणजे खरं घालणं नाही, नाही तर धमकी दिली म्हणतील. आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार असं चालवत 9 वाजताचा भोंा सुरु होईल की मुख्यमंत्री धमक्या द्यायला लागले आहेत," अशी टीकाही त्यांनी केली. 

दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीवर ते म्हणाले की, "कोण कोणासोबत युती करत असलं तरी मुंबईच्या जनतेने मनात ठरवलं आहे. कोणासोबत लढायचं हे पुढच्या काळात स्पष्ट होईल. हे एकत्रित आले किंवा वेगळे लढले तरी महापौर हा महायुतीचाच होईल". 

26 लाख लाडक्या बहिणी अपात्र

"महिला व बाल विकास खात्यात 26 लाख असे अकाउंट मिळाले आहे, जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाही. त्यात पुरुष देखील आहे, दुसऱ्या योजना लाभ घेणाऱ्या देखील आहेत, वेगवेगळ्या निकषात न बसणारे, खाते आहे. आता सगळे खाते हे तात्पुरते सस्पेंड केलेले आहे. सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल. वरील बाबी सत्य असल्यास ते अकाउंट बंद केले जातील," असं त्यांनी स्पष्ट केलं. 

Read More