Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिवसेनेचे 'ते' आमदार फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर बराच वेळ थांबले, पण गेट उघडलाच नाही; शेवटी भेट न घेताच परत आले

Maharashtra politics : शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, फडणवीस यांच्या बंगल्याचा गेट उघडलाच नाही.   

शिवसेनेचे 'ते' आमदार फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर बराच वेळ थांबले, पण गेट उघडलाच नाही; शेवटी भेट न घेताच परत आले

Tanaji Sawant meet Devendra fadnavis :  शिंदेंच्या आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट नाकारल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत हे  देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर थांबले होते. मात्र, त्यांना बंगल्यात प्रवेश मिळाला नाही.  शिंदेंच्या काळातील आरोग्य विभागातील3200 कोटींच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे संशयाच्या भोव-यात सापडलेत. यामुळेच तानाजी सावंत हे देवेंद्र फडणवीस यांनी भेटण्यासाठी गेल्याची चर्चा आहे. 

शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नाही. तानाजी सावंत देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर गेले होते.  तब्बल तीन मिनिट तानाजी सावंत हे सागर बंगल्याबाहेर थांबले होते. मात्र, सागर बंगल्याचा दरवाजा काही उघडला नाही. 

तानाजी सावंत 3 मिनिटात सागर बंगल्या बाहेर थांबले होते. मात्र, बैठक सुरू असल्याने त्यांना प्रवेश मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. उद्या विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि तानाजी सावंत यांची भेट होण्याची शक्यता आहे. 
देवेंद्र फडणवीस यांची भेट न घेताच सावंत परतल्याने चर्चांना उधाण आले आहे.  शिंदेंच्या काळातील आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामाला देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे संशयाच्या भोव-यात सापडले आहेत.

आरोग्य विभागात तानाजी सावंतांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप आपचे विजय कुंभार यांनी केला आहे. प्रस्ताव मंजूर नसताना निविदा काढण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय. आरोग्य खात्याच्या कामांना चाप बसल्यानंतर तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सागर बंगल्यावर आले होते. 

 

Read More