Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

क्षुल्लक कारणावरून मुख्याध्यापिकेची लहानग्यांना जबर मारहाण

  नाशिक रोड परिसरातील सायखेडा रस्त्यावर असलेल्या 'एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल'मध्ये धक्कादायक आणि क्रूर घटना उघडकीस आलीय. 

क्षुल्लक कारणावरून मुख्याध्यापिकेची लहानग्यांना जबर मारहाण

नाशिक :  नाशिक रोड परिसरातील सायखेडा रस्त्यावर असलेल्या 'एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल'मध्ये धक्कादायक आणि क्रूर घटना उघडकीस आलीय. 

पाचवी ते सातवीच्या मुलांना मुख्याध्यापिकेनं जबर मारहाण केल्याचं समोर आलंय. ग्रंथाली बोंडे या विद्यार्थीनीचं हस्ताक्षर चांगलं नसल्यानं तर ओम भारत भोईटे या विद्यार्थ्याचा गृहपाठ पूर्ण झाला नसल्यानं मुख्याध्यापिका जयश्री रोडे यांनी दोघांना दांडक्यानं क्रूर पद्धतीनं मारलं.

या शिक्षेनंतर दोघा विद्यार्थ्यांना नीट उभंही राहता येत नव्हतं. दोघा विद्यार्थ्यांच्या पालकांनी मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिका जयश्री रोडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. 

नाशिक पोलीस स्टेशनमध्ये पालकांचा रुद्रावतार बघून मुख्याध्यापिका जयश्री रोडेला पोलिसांनी अटक केली. 

Read More