Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime News : मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर... हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का!

 Vashi Daycare : आता एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून. मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. (Crime News ) कारण, वाशीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Crime News : मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर... हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का!

Navi Mumbai Vashi Daycare : आता एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून. मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. (Crime News ) कारण, वाशीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशी शहरात असलेल्या स्मार्ट थॉट्स डे केअर सेंटरमध्ये (Smart Thoughts Day Care Center) 16 महिन्याच्या बाळाच्या कानशिलात मारण्यात आली आहे. (Vashi Daycare)

हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. 16 महिन्यांचा चिमुकला खुर्चीवर बसला होता, तेवढ्यात टेबलावर त्याच्या समोर खायचे ताट ठेवण्यात आलं. बाळ त्या ताटातील चमचा घ्यायला जातो. मात्र, त्याचवेळी महिलेने त्याच्या कानशिलात लगावली आणि त्याला उचलून बाजूला ढकलले. 

हे बाळ घरी आल्यानंतर रडत असल्याने आई वडिलांना संशय आला. त्यामुळे पाळणाघरातील सीसीटीव्ही दाखवण्याची मागणी केली असता, घडला प्रकार समोर आला. याची तक्रार याच्या पालकांनी केली असून, तपास सुरु आहे. मात्र, पाळणाघरात तुम्ही मुलांना ठेवत असाल तर हा व्हिडिओ पाहून सावधगिरी बाळगा. 

Read More