Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कल्याणच्या पत्रीपुलाला श्रद्धांजली अर्पण करत नागरिकांचा निषेध

रस्ते विकास महामंडळ नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप

कल्याणच्या पत्रीपुलाला श्रद्धांजली अर्पण करत नागरिकांचा निषेध

कल्याण : कल्याणमधील पत्रीपुलाचं काम गेलं वर्षभर सुरु असून रस्ते विकास महामंडळ नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप करत नागरिकांनी पत्रीपुलाला श्रद्धांजली अर्पण करत निषेध व्यक्त केला. पत्रीपूल धोकादायक ठरवत गेले वर्षभर हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. या वर्षभरात नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सोमारं जावं लागलं. पत्रीपुलाचं संथगतीनं सुरु असलेलं काम आणि पुलावर होणारी वाहतूक कोंडी यास शाशन आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 

काही दिवसांपूर्वी पत्रीपुलावर रस्ते विकास महामंडळानं फेब्रुवारी 2020 पर्यंत पुलाचं काम पूर्ण होणार असल्याचे फलक लावले होते. मात्र नागरिक वाहतूक कोंडीनं त्रस्त असून पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी प्रशासन तारखांवर तारीख देत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. 

Read More