Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रुग्णालयात साफसफाई मोहीम, प्रशासनाचा असंवेदनशील कारभार

 भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाचा असंवेदनशील कारभार उघड 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रुग्णालयात साफसफाई मोहीम, प्रशासनाचा असंवेदनशील कारभार

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाचा असंवेदनशील कारभार उघड झाला आहे.  मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रशासनाने पायघड्या घातल्या आहेत. मीडिया स्टँडसमोरही कार्पेट टाकण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे इतकी मोठी घटना घडली असताना प्रशासन मात्र घटना स्थळी वेगळ्याच कामात व्यस्त आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा दौऱ्यावर आले आहेत. दुर्घटनाग्रस्त जिल्हा सामान्य रूग्णालयाची ते पाहणी करणार आहेत. नवजात बालकं गमावलेल्या पालकांचं सांत्वन ते करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह अतिरिक्त सचिव आशिष सिंह, परिवहनमंत्री अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.  दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी इथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्य़ात आला आहे.

Read More