Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादी प्रवेशाचे‌ स्पष्ट संकेत

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार हे जवळपास निश्चित...

एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादी प्रवेशाचे‌ स्पष्ट संकेत

दीपक भातुसे, मुंबई : भाजपचे ज्येष्ट नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. कारण जयंत पाटील यांनी मोदींवर टीका करणारे ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांच्यासोबत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

खडसेंच्या या रिट्विटची बातमी समोर येताच काही वेळातच खडसे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

fallbacks

खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत शरद पवारांनी देखील दिले होते, त्यानंतर एकनाथ खडसेंनी देखील यावर खुद्द संकेत दिले होते. पण आता त्यांनी रिट्विट डिलीट केले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं की, आजच्या भाषणात पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला. खडसेंनी हे ट्विट रिट्विट करत आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता खरी ठरवली आहे.

Read More