Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

साताऱ्यात या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस, अनेक घरांत, दुकानात पाणी

Rain Update News : सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. याचा तडाखा अनेक घरांना बसला.  

साताऱ्यात या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस, अनेक घरांत, दुकानात पाणी

सातारा : Rain Update News : सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. याचा तडाखा अनेक घरांना बसला. वाई, कवठे आणि मेढा भागात परिसरात रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसाचे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाणीच पाणी झाले होते. या सर्व्हिस रोड शेजारी असणाऱ्या काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते.

या पावसामुळे या भागातील अनेक शेतातील बांध आणि तळी फुटल्या आहेत. खुडेवस्ती, मोरेवस्ती, मसुदी आळी, मंडई परिसर, कुंभार अळी या ठिकाणच्या अनेक घरात पाणी घुसले होते. मेढा भागात झालेल्या मोठ्या पावसाने रस्त्याला तळ्याचे स्वरुप आले होते.

Read More