Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या 'कबीर कला मंच'च्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल झालाय. 

पुण्यात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या 'कबीर कला मंच'च्या कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल झालाय. 

चिथावणीखोर वक्तव्य आणि जमावास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. कोरेगाव भीमात १ जानेवारीला झालेल्या दंगलीला कारणीभूत असल्याचा संशय आहे. 

सुधीर ढवळे, सागर गोरख, हर्षाली पोतदार, रमेश गायचोर, दीपक डेंगळे, ज्योती जगताप या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तुषार रमेश दामगुडे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिलीय. 

याआधी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी आणि विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या विरोधातही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Read More