Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जनसंघर्ष यात्रा सभेत कॉंग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

 काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. 

जनसंघर्ष यात्रा सभेत कॉंग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

सांगली : सांगलीतील जनसंघर्ष यात्रा सभेतच काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. भर सभेत काँग्रेस नेते विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी गटबाजी करुन एकमेकांवर टीका केली. या गटबाजी करणाऱ्या स्थानिक नेत्यांना माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चांगलंच फटकारलं.

पाटलांनी भरला दम 

'ज्याला पक्षात राहायचं असेल त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि ज्यांना गद्दारी करायची त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा', असा सज्जड दम पाटील यांनी भरला. या अंतर्गत संघर्षावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Read More