Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

काँग्रेसचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन पण कार्यकर्त्यांनी हसू करुन घेतलं

काँग्रेस कार्यकर्त्यांना भानच राहिलं नाही

काँग्रेसचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन पण कार्यकर्त्यांनी हसू करुन घेतलं

जळगाव : सध्या पेट्रोल तसंच डिझेलचे भाव गगनाला भिडल्यानं विरोधी पक्षांमार्फत देशभरात याविरोधात आंदोलन सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, तसंच स्थानिक तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं.

यावेळी कार्यकर्त्यांनी इंधनाचे दर कमी व्हायला हवे अशा घोषणा देण्याऐवजी पेट्रोल-डिझेलची दरवाढ झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्यामुळे नेमकं आंदोलन कोणत्या मागण्यांसाठी याचं भानही कार्यकर्त्यांना राहिलेलं नसल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या आंदोलनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याचं काँग्रेसनं हसू करून घेतलं. 

Read More