Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज्यात आज कोरोनाचे ७९२४ रूग्ण वाढले, तर २२७ जणांचा मृत्यू

राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के इतका आहे.

राज्यात आज कोरोनाचे ७९२४ रूग्ण वाढले, तर २२७ जणांचा मृत्यू

मुंबई : आज राज्यात कोरोनाचे ७९२४ रुग्ण वाढले आहेत. राज्यात आज ८७०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २,२१,९४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५७.८४ % एवढे झाले आहे. 

राज्यात आज २२७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के इतका आहे. आतापर्यंत झालेल्या १९,२५,३९९ चाचण्यांपैकी ३,८३,७२३ (१९.९२ टक्के) चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,२२,६३७ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर ४४,१३६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज एकूण १,४७,५९२ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

Read More