Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नवीन वर्षाच्या उत्साहावर कोरोनाचा परिणाम, जाणून घ्या काय आहेत नियम

सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी 

नवीन वर्षाच्या उत्साहावर कोरोनाचा परिणाम, जाणून घ्या काय आहेत नियम

मुंबई : कोविड -19 व्हायरसमुळे यंदाचं वर्ष अनेकांसाठी बेरंग ठरलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आल्यानंतर जगभरातील लोकांच्या चिंता वाढल्या. अनेकांनी ब्रिटनमधील विमान सेवा बंद केली आहे. अनेक देशात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

भारतात ही विविध राज्यांमध्ये काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये वर्षाच्या अखेरीस लोकांनी गर्दी करु नये म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे.

- मुंबईसह सर्व प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे.

- 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान सकाळी 11 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू आहे.

- सर्व अनावश्यक दुकाने आणि सेवा बंद राहतील.

महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 10 नंतर कोणतेही कार्यक्रम सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलमनुसार सातारा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. जिल्हयातील हॉटेल व्यावसायिकांना देखील रात्री 11 पर्यंतच हॉटेल्स चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Read More