Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज्यात २४ तासात ९,२१९ कोरोना रुग्णांची वाढ, २९८ जणांचा मृत्यू

मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९,२१९ने वाढली आहे.

राज्यात २४ तासात ९,२१९ कोरोना रुग्णांची वाढ, २९८ जणांचा मृत्यू

मुंबई : मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९,२१९ने वाढली आहे. तर २९८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४ लाखांच्या वरती गेला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४,००,६५१ एवढी झाली आहे. यापैकी १,४६,१२९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजच्या एका दिवसात ७,४७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आत्तापर्यंत राज्यातले २,३९,७५५ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनामुळे राज्यात आत्तापर्यंत १४,४६३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ३.६१ टक्के एवढा आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९.८४ टक्के एवढं आहे. राज्यात आजपर्यंत कोरोनाच्या २०,१६,२३४ एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या, यापैकी ४,००,६५१ एवढ्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या, म्हणजेच राज्यात कोरोनाच्या १९.८७ टक्के टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत.

मुंबईमध्ये आज दिवसभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ११०९ने वाढली आहे. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,११,९९१  एवढी झाली आहे. आजच्या एका दिवसात मुंबईमध्ये ६० जणांचा मृत्यू झाला, यामुळे मुंबईतल्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६,२४७ एवढी झाली आहे.

पुण्यामध्ये आजही मुंबईपेक्षा जास्त तसंच राज्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. पुणे मनपा क्षेत्रात २४ तासात १,४५८ रुग्ण आढळले, यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या ५५,०३५ एवढी झाली आहे. पुण्यात एका दिवसात ४० जणांचा मृत्यू झाला. पुण्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत १,३५८ जणांचा जीव गेला आहे. 

Read More