काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पीओपी मूर्ती विसर्जनाला कोर्टानं परवानगी दिली आहे. 6 फुटांपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करता येणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. 6 फूटानंतरच्या गणेशाच्या मूर्ती ह्या समुद्र, नदी आणि तलावात विसर्जित करता येणार आहे. तशी माहिती वकिलांनी कोर्टात दिली.