Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Corona : विमा कंपन्यांनी बंद केल्या कोविड पॉलिसी, क्लेम वाढल्याने तोंडचे पाणी पळाले

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोविड विमा कंपन्यांचं तोंडचं पाणी पळालं होतं.

Corona : विमा कंपन्यांनी बंद केल्या कोविड पॉलिसी, क्लेम वाढल्याने तोंडचे पाणी पळाले

मुंबई : एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना विमा कंपन्यांनी मात्र आता कोविड पॉलिसी धोरण बंद केले आहेत. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढल्याने क्लेम देखील वाढले होते. त्यामुळे विमा कंपन्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. कंपनीला मिळालेल्या रकमेच्या एकूण 150 टक्के रक्कम क्लेम केल्यावर द्यावे लागतात. त्यामुळे नवीन पॉलिसी घेणाऱ्या आणि जुनी पॉलिसी रिनिव्ह करणाऱ्यांना आता समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कंपन्यांनी आता सर्वसाधारण प्रिमियममध्ये ही वाढ केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या भरवशावर असलेले लोकं आता संकटात आले आहेत. 

देशभरात कोरोनाचं संकट वाढत आहे. देशात दररोज 4 लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर वाढल्याने समस्या आणखी बिकट झाली आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने आणि ती आणखी घातक असल्याचं बोललं जात असल्याने आता सरकारपुढे मोठं आव्हान असणार आहे.

कोविड आल्यानंतर अनेक कंपन्यांनी नव्या कोविड हेल्थ पॉलिसी आणल्या. पण आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विमा कंपन्यांचा नफा कमी आणि क्लेम जास्त होत असल्याने विमा कंपन्या आता हात वर करताना दिसत आहे.

Read More