Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संभाजीनगरमधील महिलेला अमानुष मारहाण, तरीही आरोपी फरार, अंबादास दानवे आक्रमक

Sambhajinagar Crime News: संभाजीनगरमधील खासगी शिकवणीतील वादामुळे महिलेला झालेल्या मारहाणी प्रकरणी चार दिवसांनंतरही आरोपी फरार. पोलिसांची दिरंगाई होत असल्याने अंबादास दानवेंचा इशारा. 

संभाजीनगरमधील महिलेला अमानुष मारहाण, तरीही आरोपी फरार, अंबादास दानवे आक्रमक

Chhatrapati Sambhajinagar Crime News: संभाजीनगरमध्ये घडलेल्या शिंदे कुटुंबीयांवरील अमानुष मारहाणीच्या घटनेला चार दिवस उलटले असून, दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. पीडित महिलेला इतक्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली की तिच्या गुप्तांगावरही गंभीर इजा झाली आहे.

पोलिसांनी दोन पथक तपासासाठी रवाना केल्याची माहिती दिली असली तरी अजूनपर्यंत कोणताही ठोस परिणाम समोर आलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. एवढ्या गंभीर प्रकारानंतरही पोलिसांनी अद्या कारवाई का केली नाही की त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केलं? अशा चर्चा सध्या संभाजीनगरमध्ये रंगल्या आहेत.

..अन्यथा पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करू

दरम्यान, या प्रकरणावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर या प्रकरणी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर आम्हीच पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट असून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आता सामाजिक संघटना, राजकीय नेते यांचंही दबाव वाढू लागला आहे. आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल की पोलिस प्रशासन यातून कितपत जागं होतं आणि आरोपींवर तातडीने कारवाई होते की नाही.

नेमकी घटना काय? 

संभाजीनगरमधील सातारा येथील एका खासगी शिकवणीमध्ये दोन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादावर क्लासच्या प्राध्यापकांनी हस्तक्षेप करत दोघींनाही इतर विद्यार्थ्यांसमोर माफी मागायला लावली. यामुळे एका मुलीला लाजिरवाणं वाटलं व तिच्या मनात मानसिक त्रास निर्माण झाला. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

ही बाब समजताच संबंधित मुलीच्या वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन ‘भाऊ पोलिस आहे’ म्हणत मोठ्या आवाजात अरेरावी केली आणि शिवीगाळ केली. यावेळी तिथे असणाऱ्या आजोबांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र, हा विषय यावरच संपला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीने पुन्हा त्या विद्यार्थिनीच्या घरी धाव घेतली आणि थेट घरात घुसून विद्यार्थिनीच्या आईला कोंडून ठेवत मारहाण केली. 

Read More