Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime News : धक्कादायक! रोहित पवारांच्या मतदारसंघात अल्पवयीन मुलाकडून आठवीच्या विद्यार्थ्याला बेल्टनं मारहाण

Crime News : अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांची मारहाण. जामखेडच्या निवासी शाळेतली घटना. नववीच्या विद्यार्थ्याने आठवीच्या विद्यार्थ्याला मारलं  

Crime News : धक्कादायक! रोहित पवारांच्या मतदारसंघात अल्पवयीन मुलाकडून आठवीच्या विद्यार्थ्याला बेल्टनं मारहाण

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहिल्यानगर : (Crime News) राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षातील आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातून अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आली असून, या घटनेचा विचलित करणारा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अहिल्यानगरच्या जामखेड इथल्या निवासी मुलांच्या शासकीय शाळेत 21 एप्रिलला इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याला इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी बेल्टने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. 

घडल्या प्रकरणी शाळा प्रशासनाने जामखेड पोलिसांना माहिती दिल्यानंतर तातडीनं या घटनेची नोंद घेण्यात आली. मारहाण करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा सामाजिक पार्श्वभूमीचा अहवाल हा बाल न्याय मंडळाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे. मारहाण झालेले विद्यार्थी आणि मारहाण करणारे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळामार्फत पुढील कारवाई केली जाणारेय. मात्र लहान मुलाला बेल्टने मारहाण करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचं बोललं जात आहे. 

एका विद्यार्थ्याला रिंगण करून मारण्याचा हा प्रकार अतिशय धक्कादायक असून, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ माजली. ज्यानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना बोलवण्यातही आलं मात्र त्यांनी तक्रार दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. बाल न्याय मंडशळाकडून आता या घटनेचा अहवाल पाहून मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुढील कारवाई केली जाणार आहे. 

 

Read More