Crime News In Marathi: व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील तेव्हारा येथील तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. थार येथील एमआयडीसी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
शिलानंद तेलगोटे हे तेल्हारा तहसील अंतर्गत हिवरखेड येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. असं असताना त्यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दरम्यान तलाठ्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पत्नीवर गंभीर आरोप केले असल्याचे समोर आले आहे. पत्नी शिवीगाळ करत असल्याचा आरोप तलाठीने केला आहे. तर, मेव्हण्याला दिलेले पैसे तो परत देत नसल्याने आपल्या पगरातून पैश्याची कपात होत असल्याचेही त्यांनी स्टेटसमध्ये लिहिलंय.
मी श्री शिलानंद तेलगोटे वय 39 तेल्हारा येथे आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे कारणीभूत आहे. ती मला खूप शिव्या देते आणि माझ्या मुलासमोर मला फाशी घे, असं वारंवार सांगते. माझे पैसे तिचा भाऊ प्रविण गायगोलेकडे असून त्यांना शेतीसाठी काही रक्कम मी तलाठीकडून काढली होती. त्याचे त्याने व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारातून कपात सुरू आहे, असं त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर लिहिलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, माझी शेवटची इच्छा असल्यास माझी शेवटची इच्छा आहे की माझं शवविच्छेदन होणार नाही. तसंच, माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. आज मी पाच दिवस झाले जेवण केले नाही. माझी पत्नीसोडून कोणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल, असंही त्यांनी लिहलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंथन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने माढ्याच्या दारफळमधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंथनसारख्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने चौथीतील शाळकरी विद्यार्थ्याने उचललेले टोकाचे पाऊल उचलले आहे.