पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून काल रात्री 15 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग झाला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीये. नदीपात्रालगत गावांना आणि घरांना सतर्कतेचा इशारा दिला.