मोखाड्यातील आदिवासी भागात रस्त्याचं भयाण वास्तव पुन्हा समोर आलंय. इथल्या ठाकूरवाडीतल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रोज चिखल तुडवावा लागतो... या पाड्यावरची मुलं निरगुडवाडी इथं शाळेत जातात. मात्र त्यासाठी त्यांना रोज चिखल तुटवत शाळा गाठावी लागते. इथं रस्त्याच्या नावाने केवळ संरक्षक भिंती बाधण्यात आल्यात. संपूर्ण रस्त्यावर चिखल झालाय. त्यामुळे हा एक किलोमीटरचा रस्ता केवळ कागदावरच पूर्ण केलाय का असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.