Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब झाल्याची कबुली कॅबिनेट मंत्री दत्ता भरणेंनी दिलीये. लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होतोय असं विधान दत्ता भरणेंनी इंदापुरातील एका कार्यक्रमात केलंय. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावर टीका केलीय. पाहुयात यासंदर्भातला आमचा हा रिपोर्ट
लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यानं निधीवरून खंत व्यक्त केलीय. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास विलंब झाल्याची कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिलीय. लाडकी बहीण योजनेमुळे उशिरा निधी मिळाल्याचं विधान त्यांनी केलंय. दरम्यान भरणे कुठल्या हेतून बोलले याबाबत त्यांना विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.
मंत्री दत्तात्रय भरणेंनी केलेल्या विधानाला छगन भुजबळांनी देखील दुजोरा दिलाय. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याचं छनग भुजबळांनी म्हटलंय. एखाद्या योजनेसाठी एक मोठी रक्कम दिली जाते तेव्हा आपोआपच सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्यांच भुजबळांनी म्हटलंय.
मात्र, दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यानंतर जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावर टीका केलीय. भरणेंनी जाहीरपणे बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवारांना विचारलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीणीसाठी वळवण्यात आला होता. दरम्यान यावरून संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आता पुन्हा एकदा निधीवरून लाडकी बहीण योजनेवर मंत्र्यांनी बोट ठेवलाय. त्यामुळे ही योजना सत्ताधा-यांनाच नकोय का? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.