Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'चौफुल्यावर जाऊन तडफडू नका', कार्यकर्त्यांचा चाळा दादांची 'शाळा'

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात.

'चौफुल्यावर जाऊन तडफडू नका', कार्यकर्त्यांचा चाळा दादांची 'शाळा'

ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अजित पवारांच्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या भाषणात अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिका-यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. अजितदादांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांना कसं सुनावलं,

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात...एखाद्या मुद्यावरून अधिका-यांची कानउघाडणी असो किंवा कधीकधी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना खडसावणं असो...अजितदादा ना वेळ बघतात, ना ठिकाण...अजितदादांच्या याच बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला...पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाषण करताना अजितदादांनी पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनावलं....दौंड येथील कला केंद्रातील आमदाराच्या भावानं केलेल्या गोळीबार प्रकरणावरून अजितदादांनी नेत्यांचे कान टोचलेत...विशेष म्हणजे आमदार शंकर मांडेकरही तिथं उपस्थित होते...मांडेकरांच्या उपस्थितीतच अजितदादांनी सर्वांना खडसावलं.

भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाला चौफुला इथल्या कला केंद्रात गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.यावरून विरोधकांनी राष्ट्रवादीसह अजित पवारांना कोंडीत पकडलं आहे. काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरणावरूनही अजित पवारांना टीकेचा सामना करावा लागला होता.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिका-यांमुळे अजितदादांची पुरती कोंडी झालीय...धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यामुळे अजितदादा अडचणीत आले होते. त्यानंतर वैष्णवी हगवणे प्रकरण, दौंड कला केंद्रातील गोळीबार प्रकरणावरूनही विरोधकांनी अजितदादांवर टीकास्त्र डागलं आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिका-यांमुळे अजितदादांची पुरती कोंडी झाली...त्यामुळेच आता अजितदादांनी सर्वांचे कान टोचल्याची चर्चा आहे.

Read More