प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणा-या दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलीय. अनेक वेगवेगळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. तसंच सख्ख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपाखाली दीपक काटेला शिक्षा देखील झालीय.
प्रवीण गायकवाडांवर हल्ला केल्यानंतर दीपक काटे चांगलाच चर्चेत आला आहे. प्रवीण गायकवाडांनी त्यांच्या संघटनेमध्ये संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे दीपक काटेनी त्यांच्या तोंडाला काळं फासत मारहाण केलीय. दीपक काटेवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं देखील समोर आलंय. अनेक वेळा वेगवेगळ्या गुन्ह्यात जेलमध्ये जावून आलेला हा दीपक काटे आता लोकांना ज्ञान पाजाळतोय.
दीपक काटे हा मुळचा इंदापूर
तालुक्यातील सराटी गावाचा,
सध्या इंदापुरात वास्तव्यास
सख्ख्या चुलत भावाच्या हत्येच्या
आरोपात दीपक काटे 7 ते 8 वर्ष
जेलमध्ये राहून आलाय
6 जानेवारी 2025 पुणे विमानतळावर
काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28
जिवंत काडतूसं सापडले होते
या प्रकरणात पोलिसांनी दीपक काटेला
अटक देखील केली होती
तुरुगांत असताना दीपक काटेनं
दौंड, करमाळा परिसरात टोळ्या
तयार करून खंडणी गोळा केल्याचा
आरोप
चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष
असताना काटे हा भारतीय युवा मोर्चाचा
पदाधिकारी होता
चार वर्षापूर्वी दीपक काटेनं संभाजी
बिडीचं नाव बदलण्यासाठी पुरंदर
किल्ल्यावर उपोषण केलं होतं
काटेंनी केलेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. दीपक काटेकडे पिस्तुल आणि काडतुसं सापडल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. तसंच काटे भाजपचा पदाधिकारी असल्याचा दावा देखील रोहित पवारांनी केलाय. दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय.
गंभीर गुन्हे असलेला आरोपी मोकाट कसा? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. तसंच दीपक काटेवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तसंच अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केलीय.
दीपक काटे सध्या अटकेत असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येतेय. वेगवेगळ्या कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी मोकाट कसा फिरतोय? असा सवाल गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर उपस्थित करण्यात येतोय.