Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'जिथे आव्हान असते त्या ठिकाणी दीपाली असते'

ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदार संघातून चूरस वाढणार.

'जिथे आव्हान असते त्या ठिकाणी दीपाली असते'

ठाणे : गेल्या दहा वर्षांत मुंब्रा परिसराचा विकास झालेला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे आणि ज्या ठिकाणी आव्हान असते त्या ठिकाणी दीपाली असते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांनी दिली आहे. ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अभिनेत्री दीपाली सय्यद उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा एकदम सुरक्षित मतदारसंघ म्हणून मुंब्रा या मतदारसंघाची ओळख आहे. याठिकाणाहून आतापर्यंत जितेंद्र आव्हाड निवडणून आले आहेत. दरम्यानस शिवसेा - भाजप महाआघाडीच्या उमेदवार म्हणून अभिनेत्री दीपाली सय्यद या रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

आज अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांनीही मोठे शक्तीप्रदर्शन करीत अर्ज भरला. या ठिकाणी लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. 

Read More