Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू कधी एकमेकांचे मित्र होतील, सांगता येत नाही हे आपल्याला महाराष्ट्राचे राजकारण पाहून कळाले असेलच. देवेंद्र फडणवीसांच्या वाढिदिवसानिमित्त त्यांच्यावर राज्यभरातून कौतुकांचा वर्षावर होतोय.गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'महाराष्ट्र नायक' पुस्तकात दिग्गजांकडून फडणवीसांचे कौतूक होतंय. या सर्वात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांची सर्वाधिक चर्चा होते.
देवेंद्र फडणवीस पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारा मेहनती नेता असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केलाय. हुशार, प्रामाणिक राजकारणी आणि सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा नेता असेही ते म्हणाले आहेत. फडणवीस आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळू पाहता आला. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची काम करण्याची धडपडही जवळून पाहता आल्याचे ते म्हणाले.
फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांना पाठिबा दिला. त्यांच्या नेतृत्वखालील शिवसेना-भाजप युती सरकारने मराठी चित्रपट-नाट्य आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे राबवली.
देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या राजकीय कारकिर्दिती अनेकवेळा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने त्यांनी हा सामना केला. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र यासाख्या योजना त्यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या. ज्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांची विश्वासार्हता वाढल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने फक्त राज्यच नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दोघांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा देताना लिहिलेल्या शब्दांनी लक्ष वेधून घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे अशी साद घातली आहे. तसंच अजित पवारांचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, "विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे. महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे. महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा".पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना".
शिवसेना UBTचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मराठी माणसाचं कल्याण करा.सूडाने वागून नका असा सलाही राऊत यांनी दोघांना दिल्या आहेत.