Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विशेष लेखावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झालेत. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष लेख प्रसिद्ध झालाय. लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लेखातून फडणवीसांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विशेष लेखावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले

devendra fadnavis on emergency 50 years : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका विशेष लेखावरून चांगलंच राजकारण तापल आहे. इंदिरा गांधींनी 1975 मध्ये देशात आणीबाणी लावली होती. या आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणीबाणीच्या याच मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक लेख प्रसिद्ध झालाय. लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या लेखातून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीकास्त्र डागलं.

लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय

एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. आणीबाणी काळात विरोधी नेत्यांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकूमशाही प्रस्थापित झाली असती. काँग्रेसनं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारला कधीच स्थान दिलं नाही. उलट आणीबाणी काळात बाबासाहेबांच्या संविधानावर सूड उगण्याची भूमिका काँग्रेसनं बजावली.अशी टीका प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या लेखानंतर संजय राऊतांनी भाजपवर टीका केलीय. आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा? याचं विश्लेषण भाजपनं करावं असं आव्हान राऊतांनी केले. दरम्यान त्यांनी दिलेल्या आव्हानानंतर भाजप आमदार आशिष शेलारांनी त्यांच्यावर पलटवार केला. आणीबाणीच्या काळाला जवळपास 5 दशकं उलटून गेली आहेत. पण आणीबाणीवरून सतत राजकारण सुरू असतं. इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीरून काँग्रेसवर नेहमीच टीका केली जाते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली.  तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या 352(1) कलमानुसार आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली. सकाळी रेडिओवरून देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण झालीयेत. भाजपकडून आणीबाणीच्या मुद्द्यावरून नेहमीच काँग्रेसला आरोपांच्या पिंज-यात उभं केलं जातं. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्या लेखाच्या माध्यमातून काँग्रेस आणि गांधी घराण्यावर सडकून टीका केली. त्यामुळे आणीबाणीच्या मुद्द्यावरून राज्याचं
राजकारण चांगलंच रंगल आहे.

Read More