Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीस थेट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...


ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिला प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत ठाकरेंवर निशाणा साधला.   

 ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीस थेट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Raj Thackeray: अखरे ठाकरे बंधू एकत्र आले... महाराष्ट्राच्या राजकारमात आज लक्षवेधी घडामोड घडली. व्यापीठावर एकत्र आल्यावर ठाकरे बंधूनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 

जे बाळासाहेबांना जमलं नाही...जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. राज ठाकरेंनी भाषणात देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला. तर,  उद्धव ठाकरेंनीही आमच्यातला अंतरपाट फडणवीसांनी दूर केल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  राज ठाकरे यांनी मला श्रेय मला दिले याबद्दल आभार असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.  रुदाली सारखे भाषण ऐकायला मिळाले काहीं जणांची असूया पाह्यला मिळाली असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला. 

 25 वर्षे महापालिका असताना काही काय केले. उलट मोदींच्या नेतृत्वात काम केले. त्यांच्या काळात मराठी माणूस पायउतार झाला. आम्ही विकास केला असंही फडणवीस म्हणाले.  मराठी भाषेसाठी काढलेल्या या विजयी मेळाव्यासाठी कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा असल्याचं राज ठाकरेंनी भाषणात पुनरुच्चार केला. मराठी भाषेकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहू नका असा इशाराही त्यांनी दिला. इतकंच नाही तर मराठीसाठी कोणतीही तडजोड करणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.

विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरेंनी एकत्र राहण्याबाबत सूचक विधान केलंय. बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं अशी इच्छा राज ठाकरेंनी या भाषणादरम्यान व्यक्त केली.. तर आता एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत  उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद दिला. 

Read More