Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मागाठाणे येथे  उपस्थित होते त्यावेळी त्यांनी राजकीय फटकेबाजी केली.

आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

मुंबई : दहीहंडीमुळे राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईत राजकीय नेत्यांनी अनेक ठिकाणी दहीहंडी आयोजन केलं होतं. यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. मुंबईमधील भाजप नेते मागाठाणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. 

आता गोविंदा खेळाडू असणार असून दहीहंडी हा साहसी खेळ आहे. कोणी जखमी झालं तर सरकार तुमच्या पाठिशी आहे. खेळाडूंच्या सर्व सुविधा गोविंदांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं, छान छान वाटतंय असं मिश्किल भाष्य फडणवीस यांनी केलं. भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून आता शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करू, असंही फडणवीस म्हणाले. 

शिंदेंचा ठाकरेंना टोला
गोविंदा थर लावून हंडी फोडतात, मात्र आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनच्या आमदारांनी  एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले. शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपचे नेते सरकार स्थापन झाल्यापासून सरकार कोसळण्याचा दावा करत होते, याला मुहूर्त ठरला होता तो राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूका. 

Read More