Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

CM Eknath Shinde Birthday : अमृता फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Birthday : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अमृता फडणवीसही यात मागे राहिलेल्या नाहीत. 

CM Eknath Shinde Birthday : अमृता फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 फेब्रुवारी 2023 ला त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त त्यांच्यावर अनेक स्तरांतून शुभेच्छांचा वर्षावही करण्यात येत आहे. विरोधकांपासून समर्थकांपर्यंत प्रत्येकजण मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आहेत. इतकंच काय, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis ) यांनीसुद्धा गुरुवारी ठाणे गाठत एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामागोमाग त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही मुख्यमंत्र्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. 

सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना Wish केलं. 'महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना !', असं लिहित त्यांनी या शुभेच्छा दिल्या. फडणवीसांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्यानंतर अनेकांनीच त्यावर कमेंट करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. 

'महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना !', असं लिहित त्यांनी या शुभेच्छा दिल्या. 

अमृता फडणवीस यांची फॅशन सेन्स कायमच चर्चेत... 

एका राजकीय नेत्याची पत्नी असण्यासोबतच अमृता यांनी कायमच त्यांचं वेगळेपण जपलं आहे. नोकरीला प्राधान्य देणं, एक पत्नी आणि आई म्हणून जबाबदारी सांभाळणं यासोबतच समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत काही समाजोपयोगी कामांमध्ये योगदान देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. 

हेसुद्धा वाचा : Kopri Bridge Inaugration : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला ठाणेकरांना खास भेट; वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका

 

कलाजगतामध्येही त्या आपलं नशीब आजमावतात. मग ती त्यांची विविध गाणी असो, किंवा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती असो. अमृता फडणवीस जिथे जिथे.... चर्चा आणि कॅमेरे तिथे तिथे... असंच काहीसं समीकरण पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वीच त्यांचं  "आज मैने मूड बना लिया'' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. युट्यूबवर काही क्षणांतच या गाण्यानं धुमाकूळ घातला होता. फक्त गाणंच नव्हे त्या स्वत:सुद्धा या गाण्यात झळकल्या होत्या. जिथं त्यांची Dancing Style पाहायला मिळाली होती. 

Read More