Dharashiv Crime News: जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाची विक्री केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. 100 रुपयांच्या बॉण्डवर करार करत या महिलेने 10 हजार रुपयाला मुलाची विक्री केली. या महिलेने मुलाला का विकले यामागचे कारण समजल्यावर पोलिसही हादरले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापुरातील दांपत्याला मुलाची विक्री केल्याचा आरोप आहे. शंभर रुपयांच्या बॉण्डवर दत्तक करार करत दहा हजार रुपयाला मुलाची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.
चिमुकल्या मुलाची आई, तिच्या मामी यांनी चाळीसगाव इथ आपल्या नातवाची विक्री केल्याचा आजीचा गंभीर आरोप आबहे. गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे, चिमुकल्या मुलाच्या आईच चाळीस गावातील व्यक्तीसोबत दुसरे लग्न ठरले आहे. पहिल्या पतीचे निधन झाले असून तिला दुसरे लग्न करायचे आहे. त्यामुळे पहिल्या पतीपासून झालेलं मूल दत्तक देत असल्याचा दत्तक करारात उल्लेख करत चिमुकल्या मुलाची आई आणि सावत्र वडिल यांनी दत्तक करार करत मुलाची विक्री केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
सुनेने नातवंडाला न दिल्याने मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचाही आजीचा आरोप आहे. सून आणि नातू घरातून गायब झाले असल्याची मिसिंग तक्रार आजीने यापूर्वीच धाराशिवच्या मुरूम पोलिसात दिली होती. त्यानंतर सुनेचा दुसरा लग्न आणि नातवाला विक्री केल्याचं समजलं असे आजीने सांगितले. सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने चिमुकल्या मुलाला ताब्यात घेत बालकल्याण समितीसमोर हजर केले. धाराशिव येथील सरकारी रुग्णालयात चिमुकल्या मुलावर उपचार सुरू आहेत.
दत्तक करार करत ज्यांना मुलाची विक्री केली त्या ठिकाणी मूल अतिसार आणि तापीने फणफणलेल्या अवस्थेत आढळल्याची सामाजिक माहिती कार्यकर्त्यांनी दिली. मुलगा दत्तक प्रक्रिया बेकायदेशीरपणे झाली असल्याचा बालकल्याण समितीचा प्राथमिक निष्कर्ष आहे. गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बालकल्याण समितीने धाराशिव येथील सह्याद्री अंकुर शिशुगृहात बाळाला दाखल करण्याच्या सूचना दिल्या मात्र गालफुगी ताप आणि जुलाब असल्याने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती शिशुग्रह चालक डॉक्टर दापके यांनी दिली. चिमुकल्या मुलावर धाराशिव येथे उपचार सुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलेमध्ये धाराशिवच्या सरकारी रुग्णालयासमोर शाब्दिक बाचाबाची झाली.