Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धाराशिवमध्ये 'मुन्नाभाई शिक्षणाधिकारी', बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बदलीमागे कोणाचा वरदहस्त?

Dharashiv crime: धाराशिवमध्ये शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून आवडत्या ठिकाणी बदली केल्याचं समोर आलं होतं.

धाराशिवमध्ये 'मुन्नाभाई शिक्षणाधिकारी', बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बदलीमागे कोणाचा वरदहस्त?

Dharashiv crime: धाराशिवमध्ये शिक्षकांनंतर शिक्षणाधिका-यांनी देखील बोगस प्रमाणपत्र देऊन बदली केल्याचं समोर आलंय. मात्र, अजूनही या शिक्षणाधिका-यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसंच फेरतपासणीसाठी मंत्रालयात पाठवण्यात आलेल्या या फाईल्स अजूनही तशाच पडून आहेत.

फाईल्स 9 महिन्यांपासून मंत्रालयात धूळ खात

धाराशिवमध्ये शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून आवडत्या ठिकाणी बदली केल्याचं समोर आलं होतं. दरम्यान या घोटाळ्याचा झी 24 तासनं पर्दाफाश केला होता. मात्र, आता शिक्षकच नव्हे तर शिक्षणाधिका-यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दरम्यान यासंदर्भातील फाईली या 9 महिन्यांपासून मंत्रालयात धूळ खात पडल्या आहेत.

राज्यात 369 अधिका-यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस

7 ऑगस्ट 2024 रोजी प्रहार संघटनेनं शिक्षण अधिका-यांच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर दिव्यांग कल्याण विभागानं संपूर्ण राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोधमोहिम राबवली. या मोहिमेत राज्यात 369 अधिका-यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचं आढळून आलं. यामध्ये धाराशिवचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांचं नाव 265 क्रमांकावर आहे

 फेर तपासणीसाठी दिलेल्या फाईल्स अजूनही तशाच 

त्यानंतर 25 ऑगस्ट 2024 रोजी दिव्यांग कल्याण आयुक विभागानं ही माहिती धाराशिव जिल्हाधिका-यांना दिली. 30 ऑगस्ट 2024 रोजी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर 10 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना फेर तपासणीसाठी पत्र पाठवलं. दरम्यान मागील नऊ महिन्यांपासून फेर तपासणीसाठी दिलेल्या फाईल्स अजूनही तशाच पडून आहेत.

अधिका-यांवर कोणाचं वरदहस्त?

मागील 9 महिन्यांपासून बदलीच्या या फाईल्स मंत्रालयात पडून आहेत.. दरम्यान या प्रकरणी 9 महिने उलटूनही कारवाई का करण्यात आली नाही?, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून बदली केलेल्या अधिका-यांवर कोणाचं वरदहस्त आहे का? असे असंख्य प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत.

Read More