Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मोठी बातमी : तुळजाभवानीची तलवार कुठंय? अखेर मंदिर संस्थानचा लेखी खुलासा समोर

TuljaBhavani Temple godess talwar : तुळजाभवानी मंदिरातील ती पूजा आणि त्यानंतर तलवार गहाळ झाल्याची माहिती. नेमकं काय, का आणि कसं झालं..? मंदिर संस्थाननं दिली माहिती   

मोठी बातमी : तुळजाभवानीची तलवार कुठंय? अखेर मंदिर संस्थानचा लेखी खुलासा समोर

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या मंदिरांपैकी एक तुळजापूरच्या  तुळजाभवानी मंदिरातील (TuljaBhavani Temple godess talwar) शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला होता. मंदिर संस्थांच्या खजाना खोलीत ही तलवार होती मात्र ती तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजाऱ्यांनी करत मंदिर संस्थानकडून आपल्याला अपेक्षित उत्तर मिळालं नसल्याची नाराजीसुद्या व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यानंतर अखेर भाविकांसाठीसुद्धा महत्त्वाच्या असणाऱ्या आणि देवीच्या आयुधांपैकी एक असणाऱ्या या तलवारीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. 

मंदिर संस्थाननं लेखी खुलासा करत काय म्हटलं? 

तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार सुरक्षित, तलवार गहाळ झाल्याची अफवा असल्याचं तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लेखी खुलासा (शनिवार 2 ऑगस्ट 2025) नुकताच समोर आला आहे.   तलवार दैनंदिन पूजेसाठी वकोजी बुवा मठात ठेवली असल्याची माहिची संस्थाननं यावेळी जारी केली. 

मंदिरात कोणची पूजा करण्यात आली, ज्यानंतर तलवार गहाळ झाल्याची बाब चर्चेत आली? 

मंदिरात सुरू असणाऱ्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून पद्मश्री गणेश द्रविड यांच्या हस्ते मंदिरात विधीवत पूजा  करण्यात आली होती. या पूजेच्या माध्यमातून शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्यांचा आरोपही पुजाऱ्यांनी केला होता. मात्र, मंदिर वास्तूतील आत्मबल संवर्धित व्हावे यासाठी काशी स्थित गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या हस्ते पूजा करण्यात आली होती, ज्यानंतर पूजेदरम्यान वापरलेली तलवार दैनंदिन पूजेसाठी वकोजीबुवा मठाचे मताधिपती महंत तुकोजी बुवा यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थाननं दिली.  

हेसुद्धा वाचा : 'महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली, भाषा संपली तर...'; रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन 

दरम्यान, सध्या तलवारीची नित्य पूजा वाकोजी बुवा मठ येथे महंत तुकोजी बुवा गुरु बाबाजी बुवा यांच्यामार्फत होत असून, वाकोजी बुवा मठ इथ तलवार सुस्थितीत असल्याची माहिती तुळजापूर मंदिर संस्थानच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली. सुरुवातीला तलवारी बाबत माहिती घेऊन सांगतो अशी भूमिका घेणाऱ्या मंदिर संस्थांचे प्रसिद्ध पत्रक समोर आल्यानंतर हा संपूर्ण तपशील समोर आला. 

Read More