Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पतीच्या संशयाने केला घात! धारदार शस्त्राने संपवलं पत्नीचं आयुष्य

Dhule Crime:  42 वर्षीय महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. 

पतीच्या संशयाने केला घात! धारदार शस्त्राने संपवलं पत्नीचं आयुष्य

प्रशांत परदेशी, झी 24 तास, धुळे: पती पत्नीचं नात्याला संशयाची किड लागली की ती नातं पोखरायला सुरुवात करते. यानंतर ते नात कोणतं वळण घेईल,कोणत्या टप्प्यावर थांबेल हे सांगता येत नाही. अशावेळी अनेक नाती धक्कादायक वळणावर संपुष्टात येतात. असात एक प्रकार धुळ्यामध्ये समोर आलाय. येथे पतीला आलेला संशय पत्नीचे आयुष्य संपवण्यास कारणीभूत ठरला. पतीला संताप अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात नको ते कृत्य केले. 

धारदार शस्त्राने गळा चिरून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील देवपुरातील पांजरानदी काठा नजीक घडली आहे. रस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले आहे. देवपूरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या समांतर रस्त्यावर 42 वर्षीय महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. 

घटनेची माहिती मिळताच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रेड्डी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

'तारक मेहता' फेम अभिनेत्री मोठ्या संकटात, हाती नाही काम; भावाचा मृत्यू, बहीण व्हेंटिलेटरवर

कौटुंबिक वादातून 42 वर्षीय अनिता बैसाणे हीचा खून करण्यात आला आहे. पती हिरामण बैसाणे याला पोलिसांनी अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन अनिता यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक : अनेक वर्षांनंतर दिव्या भारतीच्या मृत्यूचं सत्य समोर; सहकलाकाराचा मोठा खुलासा

Read More