Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर धुळ्यात हल्ला

जमावाच्या हल्ल्यात ५-७ पोलीस जखमी

वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर धुळ्यात हल्ला

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना दुर्बळया येथे घडली. या हल्ल्यात डीवायएसपी संदीप गावित, सहायक निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह पाच ते सात पोलीस जखमी झाले. महिला कर्मचारी यमुना परदेशी या गरोदर असून जमावाने ढकलून दिल्यामुळे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

 

Read More