विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर, झी मीडिया : पोलीस ठाण्यात गेल्यावर योग्य वागणूक मिळत नाही, पोलीस उद्धट बोलतात , राग राग करतात , ओरडून बोलतात, योग्य तपास करत नाही, अशा अनेक तक्रारी सर्वसामान्य करत असतात आणि पोलिसांबाबतच्या याच तक्रारींची दखल घेत एक अभ्यासक्रम तयार केला आहे.
सर्वसामान्य आपली तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जातात तेव्हा पोलीसी खाक्याबरोबरच पोलिसांच्या वर्तुणुकीचे वेगवेगळे अनुभव सर्वसामान्य येत असतात. त्यामुळे तक्रार देण्यासाठी गेलेले सर्वसामान्यचं पोलिसांच्या तपासकामाची, वर्तनाची तक्रार करताना दिसतात. पोलिसांची ही प्रतिमा सुधारावी आणि ख-या अर्थानं त्यांची कार्यक्षमता वाढावी, पोलिसी जबाबदारीची जाणीव वाढावी यासाठी पोलीस खात्याने पोलिसांना धडे द्यायचे ठरवलंय. अगदी शिपायापासून ते वरिष्ठ पोलीस अधिका-यापर्यंत प्रत्येक रँकसाठी खास कोर्स तयार केले आहेत.
पोलिसांसाठीच्या या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे
-पोलिसांची कार्य क्षमता वाढवण्यासाठी ,
- तक्रार घेऊन येणा-यांसोबत चांगली वागणूक ठेवण्यासाठी
- शिपाई ते वरिष्ठ पोलीस अधिका-यांसाठी कोर्स सक्तीचा
-- पोलिस रँकनुसार कोर्सची आखणी
-- पाच वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन कोर्स
-- हे सर्व ऑनलाईन कोर्स 27 मिनिटांपासून ते दोन तास अवधीचे
-- कोर्ससाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांचा पर्याय
-- वरिष्ठ अधिका-यांनी हे कोर्स 100%पूर्ण करुन घ्यावेत
असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. प्रत्येक पोलिसाला किमान 5 कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवायची आहेत.
यासाठी राज्यातील सर्व पोलिसांना भारत सरकारच्या IGOT कर्मयोगी पोर्टलवर नोंदणी करून हे कोर्स पूर्ण करायचे आहेत. हे कोर्स महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस रिसर्च अँड डेव्हलप मेंट संस्था, सीबीआय, यांनी संयुक्तरित्या बनवले आहेत. हे कोर्सेस शिपायापासून ते वरिष्ठ अधिका-यांसाठी तयार केले आहेत.
- सायबर स्पेसमध्ये सुरक्षित राहणे
- दहशतवादी घटनांचा तपास कसा करावा
- नाईट पेट्रोलिंग
- फॉरेन्सिक सायन्स
- पोस्को ऍक्ट बाबत पूर्ण अभ्यास
- इंटरोगेशन टेक्निक, खुनाचा तपास
-ड्युटी वर काय करावे आणि काय करू नये
- कामावेळी तणावात योगासाठी ब्रेक कसा घ्यावा
तर ACP आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी
- मृदू आवाजात कसे बोलावे
- वाटाघाटी कशा कराव्या आणि त्यात कसे जिंकावे
अशी काळाशी सुसंगत कौशल्य शिकवण्यात येईल
पोलिसांसाठी आखलेल्या कोर्समधून पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, पोलिसांचे नागरिकांसोबत वर्तणूक ही सुधारेल, पोलिसांची प्रतिमा नागरिकांमध्ये सुधारेल मात्र पोलीस खाक्या कायम राहील ही आशा आहे.