Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अमरावतीत गोळीबारात एक ठार, चार जखमी

शहरातील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरमध्ये जुन्या वादातून शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

अमरावतीत गोळीबारात एक ठार, चार जखमी

अमरावती : शहरातील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरमध्ये जुन्या वादातून शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यात एक जण ठार तर चार जण  जखमी झालेत. दोन गट समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्यानंतर सशस्त्र हल्ला चढविण्यात आला.

तलवार हल्ला आणि गोळीबार

एका गटाने देशी कट्ट्यातून फायर केल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तलवारीने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहे.अन्सार शहा जमील शहा (२८, रा. अलहीलाल कॉलनी) असे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

 जखमींचे नावे 

तर राजीक ऊर्फ राजा शहा युसूफ शहा (३५), शाकिर शहा बसीर शहा (३२) आणि नौशाद शाह मुस्ताक शाह (२८, सर्व रा. हबीबनगर) अशी जखमींचे नावे आहेत. 

हॉर्न वाजवण्यावरून वाद!

 दुचाकी वाहनाच्या हॉर्न वाजवण्यावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

Read More