Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नवजात बालकाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरच बनले ऍम्ब्युलन्स चालक

डॉक्टराचं होतंंय कौतुक 

नवजात बालकाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरच बनले ऍम्ब्युलन्स चालक

मुंबई : कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत. अशा परिस्थितीत माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना समोर येत आहेत. अलिबागमधील एका डॉक्टरने एका नवजात बालकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या बाईकलाच ऍम्ब्युलन्स बनवलं आहे. 

या नवजात बालकाला आयसीयुमध्ये दाखल करण्यासाठी डॉक्टरने नर्ससोबत दीड किमीचा प्रवास केला. यामुळे बाळाचे प्राण वाचले आहेत. सध्या डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्याच स्तरावरून कौतुक होत आहे. 

मंगळवारी सकाळी ७.३० वाजता डॉ. वाजे नर्सिंग होममध्ये बाळाचा जन्म झाला. २.९ किलो वजनाच्या बाळाला श्वासोच्छवासात त्रास होत होता. तसेच नवजात बाळाला सायनसचा त्रास होता. बाळाची त्वचेचा रंग बदलून निळा आणि ग्रे रंगाची झाली. त्या बाळाचा हा त्रास अधिक पसरू नये म्हणून त्याला NICU मध्ये दाखल करण्यात आलं. 

बाळाची ३२ वर्षीय आई ही शिक्षिका असून त्यांची तब्बेत देखील नाजूक आहे. ठरलेल्या तारखेपेक्षा १० दिवस अगोदर या बाळाचा जन्म झाला असून बाळाच्या आईने सिझेरिअन मार्फत बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या आईला मधुमेह आणि इतर व्याधी होत्या. 

Read More