Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज'

 मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज, असं म्हटलं आहे.

'मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज'

सातारा : साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे आपल्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात, उदयनराजे यांनी, मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज, असं म्हटलं आहे.

या किल्ल्यांचे जतन केले पाहिजे

'देशाला फक्त शिवाजी महाराजांचेच विचार तारतील. शिवाजी महाराजांनी इतक्या कमी कालावधीत साडे तीनशेहून अधिक गडकिल्ले बांधले, ही अशक्य गोष्ट महाराजांनी शक्य केली. त्यामुळे या किल्ल्यांचे जतन केले पाहिजे' असं यावेळी उदयनराजे म्हणाले.

पुरातन वास्तूंचं संग्रहालयाचं काम पुन्हा सुरू होणार

सातारा एसटी स्टॅन्ड शेजारी बांधकाम सुरु असलेल्या छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुरातन वास्तूंचं संग्रहालय बांधल जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून निधीअभावी हे बांधकाम मध्यंतरीच्या काळात निधीअभावी बंद पडले होतं. 

ऐतिहासिक संग्रहालयाला ५ कोटी रुपयांचा निधी

उदयनराजे यावेळी म्हणाले, सातारा मराठा साम्राज्याची राजधानी असून, या ऐतिहासिक संग्रहालयाला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आणखी १० कोटींचा निधीही मी मंजूर करुन आणू शकतो, पण श्रेयवादाच्या लढाईत मी पडणार नाही.

उदयनराजे यांनी पुरातन खाते आणि पीडब्लूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना, त्याच बरोबर इतर विभागाच्या प्रमुख लोकांना त्यांनी या ठिकाणी बोलावून घेतले होते.

Read More