हेमंत चापुडे / पुणे : Dr. Amol Kolhe Horse Rideing : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घाटात घोडी धरली आणि राज्यभर त्याची चर्चा झाली. अमोल कोल्हे यांच्या या घोडेस्वारीचा थरार पाहून त्यांच्या शेखर पाचूंदकर या मित्राच्या आईने 'परत असे घोडीवर बसायचं नाही', अशी प्रेमळ तंबी दिली. आणि त्यांची दृष्टही काढली. (Dr. Amol Kolhe's friend mother Said, kisi ki nazar na lage) डॉ. अमोल कोल्हे यांनी हाच व्हिडिओ शेअर केला आहे. आणि 'मातामाऊली अशी काळजी घेतात, तेव्हा आणखी बळ मिळतं!' अशी भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द पाळत घोडीवर स्वार झाले. यानंतर राज्यात एकच चर्चा सुरु झाली. बैलगाडी शर्यतीत बारी जिंकली आणि धुराळा ही उडाला. प्रामाणिकपणे काम केलं की जनता हृदयात बसवते व डोक्यावरही घेते, असे सांगत त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. धामणी आणि आज पाबळच्या घाटात युवा मित्रांनी खांद्यावर उचलून घेतलं तेव्हा निवडणुकीची आठवण झाली. तेव्हाही तरुणाईने असंच भरभरुन प्रेम माझ्यावर केलं होतं व आजही त्यांचा तो विश्वास माझ्यावर तसाच आहे,हे पाहून समाधान वाटलं, असे कोल्हे यांनी ट्विट केले आहे.
मातामाऊली अशी काळजी घेतात तेव्हा आणखी बळ मिळतं!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 17, 2022
काल घाटात घोडी धरल्यावर माझे स्नेही शेखरदादा पाचुंदकर यांच्या मातोश्रींनी आधी दृष्ट काढली आणि परत असं धाडस करताना विचार कर अशी मायेची तंबीही दिली! pic.twitter.com/3qVA2dfu5d
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी सत्यात उतरवला आहे. कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार' झाल्याचे पाहायला मिळाले. आधी चुंबन नंतर टाप, हात सोडून अमोल कोल्हे यांची तुफान घोडेस्वारी झाली. यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवीत घोडीवर स्वार झाले होते.